Nashik | पुराच्या पाण्यात पूल वाहून गेला, ग्रामस्थांनी शेतमाल वाहतुकीसाठी केला हा जुगाड | Sakal

2022-09-23 205

नाशिकच्या सोमठाणेमध्ये पुराच्या पाण्यात फरशी पुल वाहून गेल्याने शेतमाल वाहतुकीसाठी शेतकऱ्यांनी पाळण्याचा जुगाड केलाय. पूल वाहून गेल्याने शेतकऱ्यांनी शेतमाल बाजारात नेण्यासाठी रिकाम्या प्लॅस्टिकच्या ड्रमच्या माध्यमातून शेतमाल वाहतुकीसाठी मार्ग शोधलाय. मात्र त्यासाठी दररोज देव नदीच्या पाण्यातून शेतकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. टोमॅटो विक्रीसाठी दररोज शेतमाल बाजारात नेण्यासाठी प्लॅस्टिकचे ड्रम दोरखंडाला बांधून त्यावरून टोमॅटोचे कॅरेट शेतकऱ्यांकडून वाहून नेले जातायत. त्यामुळे तातडीनं पूल बांधण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

Videos similaires